मनमाडच्या अनकवाडे शिवारात कार-ट्रकच्या अपघातातील मृतांची संख्या ४ वर
मनमाडच्या अनकवाडे शिवारात कार-ट्रकच्या अपघातातील मृतांची संख्या ४ वर
img
Nandini khandare More
शहरातून जाणाऱ्या इंदौर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अनकवाडे शिवारात असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिज नजीक असलेल्या अवघड वळणावर सकाळच्या सुमारास ट्रक आणि झायलो कारचा समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तीन महिलांसह एक पुरुष ठार झाले असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये स्त्री, पुरुष, लहान बालकांचा समावेश असून मालेगाव, नाशिक या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आज सकाळी आठच्या सुमारास मनमाड-येवला महामार्गावर अनकवाडे शिवारात हा भिषण अपघात झाला. प्रचंड मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थ नागरीक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी भीषण दृश्य दिसून आले. अपघात इतका प्रचंड होता की, मालवाहतूक कंटेनर रस्त्याच्या खाली उतरून खोलगट भागात पलटी झाला तर झायलो कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. 

झायलो कार एम.एच.१२, एफ.यू. ३७६४  ही श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथून मनमाडकडे येत होती. या गाडीत स्त्री-पुरूष, लहान मुले असे ११ प्रवाशी होते. तर कंटेनर एच.आर.४७ एच.७५५० हा मनमाडकडून भरधाव वेगाने येवल्याकडे चालला होता. अनकवाडे शिवारातील रेल्वे ओव्हवर ब्रिज नजीक असलेल्या अवघड वळणावर दोन्ही वाहने समोरा समोर धडकली, अपघातानंतर कार रस्त्याच्या खाली जाऊन उलटली तर कंटेनर ट्रक विरूध्द दिशेने कलंडला. महामार्ग पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमीना तातडीने उपचारासाठी मनमाड, येवला, मालेगाव येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. अपघातानंतर या महामार्गावरची दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती.

अपघातमध्ये मयतांचे व जखमींचे नावे...

या अपघातामध्ये निमाज नियाज शेख (वय२४), शब्बीना रूज्जू शेख (वय २०), हाफीज उन्निसा शेख (वय २५), कलीमुन्नीसा अहमद (वय ३०) या चौघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शमीम हकीम शेख (वय ३०), चांदबाबू हाशीम शेख (वय ३५), रिजवान शेख (वय ३०), नसीमुन्नीसा नसरूम शेख (वय ४०), मोहम्मद जिशान कमल शेख (वय ६०), मोहम्मद अहेसान शेख (वय ६), काशीराम (वय ४५, पूर्ण नाव मिळून आले नाही) हे जखमी झाले. त्यांच्यावर नाशिक, मालेगाव अशा ठिकाणी उपचार सुरू आहे. 

गावी जाण्यासाठी निघाले अन् काळाने घातला घाव..

झायलो कारमधील ११ प्रवाशी हे महाराज गंज जिल्हा बलरामपूर उत्तरप्रदेश येथील आहे. श्रीरामपूर येथे ते व्यवसायीक कामानिमित्त राहत होते. मनमाड रेल्वे स्थानकातून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या रेल्वे गाडीने ते आपल्या मूळ गावी जाण्यासाठी येत होते अशी चर्चा होत होती.

इतर बातम्या
नाशिकमध्ये उद्या

Join Whatsapp Group