कचरा, दूषित पाणी अन् ड्रेनेजवर नगरसेवक आक्रमक;  अधिकाऱ्यांना धारेवर धरत ‘घरी बसविण्या’ची मागणी
कचरा, दूषित पाणी अन् ड्रेनेजवर नगरसेवक आक्रमक; अधिकाऱ्यांना धारेवर धरत ‘घरी बसविण्या’ची मागणी
img
दैनिक भ्रमर
सातपूर -परिसरातील कचरा, दूषित व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, ड्रेनेजची समस्या, बंद पथदिप तसेच मोकाट कुत्र्यांचा प्रश्नावरून सातपूर प्रभाग समितीची बैठक चांगलीच गाजली. नागरिकांच्या मूलभूत समस्यावरून महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. समस्या सोडविता येत नसतील तर अधिकाऱ्यांनी खुर्च्या खाली कराव्यात, अशी संतप्त मागणीही बैठकीत करण्यात आली.

 सातपूर विभागीय कार्यालयात प्रभाग समितीचे सभापती समाधान देवरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नागरी समस्यांप्रश्नी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नगरसेवक निवृत्ती  इंगोले यांनी मोकाट कुत्र्यांचा प्रश्न उपस्थित केला या  कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिकाचा बळी गेल्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही.मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा तसेच प्रभागातील ड्रेनेजची समस्याही गंभीर असून अनेक ठिकाणी ड्रेनेजचे घाणपाणी नागरिकांच्या घरांसमोरून वाहत  आहे.या ड्रेनेजची समस्या सोडवली गेली नाही तर अधिकाऱ्यांना त्याच ड्रेनेजच्या पाण्यात अंघोळ घालू. अशी संतप्त  प्रतिक्रिया व्यक्त केली.प्रभागातील काही भागांत गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नगरसेविका सविता काळे यांनी केली. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.

नगरसेविका मानसी शेवरे यांनी प्रभागात धूर फवारणी नियमित होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. अनेक ठिकाणी रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग साचले असून, वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. घंटागाडी नियमित करून कचरा संकलन व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी त्यांनी केली.

विश्वास नागरे यांनीही अनेक पथदीप बंद असल्याची तक्रार केली.नागरिक  महापालिकेला  कर वेळेवर भरतो. मात्र त्याच्या बदल्यात मूलभूत सुविधा मिळणे अपेक्षित आहे.मात्र प्रभागातील नागरिक  महापालिकेला  कर वेळेवर भरतो. मात्र त्याच्या बदल्यात मूलभूत सुविधा मिळणे अपेक्षित आहे.मात्र प्रभागातील रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्याने रात्री नागरिकांना अंधारातून ये-जा करावी लागते. पथदिवे बंद असल्याने रस्त्यावर दुर्घटना किंवा चोरीची घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्याची वाट पाहू नये. बंद पथदिपाची पाहणी करून महापालिकेने तातडीने दुरुस्ती करावी. पथदिवे बंद असल्याने रात्री नागरिकांना अंधारातून ये-जा करावी लागते. पथदिवे बंद असल्याने रस्त्यावर दुर्घटना किंवा चोरीची घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होण्याची वाट पाहू नये. बंद पथदिपाची पाहणी करून महापालिकेने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली.

या बैठकीत नगरसेवक विश्वास नागरे ,नितीन निगळ , नगरसेविका इंदुबाई नागरे,अंकिता शिंदे ,नयना जाधव ,मानसी शेवरे,माधुरी बोलकर ,सविता काळे,आदीसह विविध खात्याचे संबंधित अधिकारी उपस्थित होते

 घंटागाडी नियमित येत नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे साचले आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. घंटागाडी नियमित करून कचरा संक्रांत व्यवस्था सुरळीत करावी तसेच काही भागांत कमी दाबाने व  दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा सुरू करावा. अनेक ठिकाणी पथदिवे बंद असून, झाडांच्या फांद्या व वेली वाढल्याने काही पथदिवे पूर्णपणे झाकले गेले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यांवर अंधार पसरत असल्याने बंद पथदिवे तातडीने दुरुस्त करावेत आणि झाडांच्या फांद्या-वेलींची छाटणी करावी, अशी मागणी नगरसेविका इंदुबाई नागरे यांनी  प्रभाग सभेत केली
इतर बातम्या
Join Whatsapp Group