बचावकार्यादरम्यान मोठी दुर्घटना ! मच्छीमारांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRF जवानांच्या दोन बोटी उलटल्या
बचावकार्यादरम्यान मोठी दुर्घटना ! मच्छीमारांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRF जवानांच्या दोन बोटी उलटल्या
img
Nandini khandare More
मच्छीमारांच्या मदतीसाठी रवाना झालेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) दोन बोटी अचानक उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत SDRF चे तब्बल १० जवान बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली असून बेपत्ता जवानांचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात ही दुर्घटना घडलीये. बेथुपल्ली तलावात अडकलेल्या मच्छीमारांना वाचवण्यासाठी गेलेल्या SDRF च्या दोन बोटी अचानक उलटल्या. या दुर्घटनेत १० पोलीस कॉन्स्टेबल बेपत्ता झालेत. मिळालेल्या माहितीनुसार, जोरदार वारा आणि पाण्याच्या प्रवाहामुळे या दोन्ही बोटी उलटल्या. बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी डायव्हर्स आणि बचाव पथकाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नेमकी दुर्घटना कशी घडली? खम्मम जिल्ह्यातील सथुपल्ली भागात ही दुर्घटना घडली. या भागातील बेथुपल्ली तलावात पाच मच्छीमार अडकले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी SDRF चे पथक दोन बोटी घेऊन तलावात गेले होते. पण बचावकार्य सुरू असतानाच जोरदार वारा आणि पाण्याच्या प्रवाहामुळे दोन्ही बोटी अचानक उलटल्या.

या घटनेनंतर SDRF चे १० जवान बेपत्ता झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी डीप-सी डायव्हर्स आणि बचाव पथकातील कर्मचारी तलावात शोधमोहीम राबवली जातेय. वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या दुर्घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बचावकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. खम्मम जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना SDRF च्या जवानांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलण्यास सांगितलंय. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनाही या संपूर्ण घटनेचा वेळोवेळी आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

दरम्यान यापूर्वी तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातही एक दुर्घटना घडली होती. याठिकाणी दांडिया कार्यक्रमादरम्यान रोषणाईसाठी उभारलेली कमान अचानक कोसळली होती. या घटनेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता, तर १२ जण जखमी झाले होते.

राज्याच्या मंत्र्यांकडून बचावकार्याचा आढावा तेलंगणाचे महसूल, गृहनिर्माण तसंच माहिती आणि जनसंपर्क मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांनी बेथुपल्ली तलावातील दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केलीये. सथुपल्ली मतदारसंघातील बेथुपल्ली तलावात SDRF च्या बोटी उलटल्याच्या घटनेचा सरकारकडून सातत्याने आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेची माहिती घेतली असून SDRF च्या जवानांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत, असंही मंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
इतर बातम्या
Join Whatsapp Group