धक्कादायक !  बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर बेपत्ता ;सहा जणांचा शोध सुरू
धक्कादायक ! बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर बेपत्ता ;सहा जणांचा शोध सुरू
img
Nandini khandare More
उत्तराखंडमधून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. बद्रीनाथहून परतणारे प्रवासी हेलिकॉप्टर अचानक बेपत्ता झाले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण सहा जण प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. हेलिकॉप्टरचा संपर्क तुटल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून, बेपत्ता हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात बद्रीनाथ धामहून येणारं एक हेलिकॉप्टर अचानक बेपत्ता झाल्याची माहिती आहे. बद्रीनाथ आणि जोशीमठ दरम्यान ही घटना घडली आहे. हेलिकॉप्टरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लोकेशन मिळत नाहीय. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन टीमने हेलिकॉप्टरचा शोध सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेपत्ता हेलिकॉप्टरच्या शोधासाठी सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं आहे. या मोहिमेत दोन अन्य हेलिकॉप्टर्सनाही लावण्यात आलय. दुसरी हेलिकॉप्टर्स बेपत्ता असलेल्या हेलिकॉप्टरच लोकेशन शोधत आहेत.

सतत कोसळणारा पाऊस आणि दाट ढगांमुळे दृश्यमानता खूप कमी आहे. बचाव मोहिमेतील टीम्स आणि हेलिकॉप्टर्सना शोध घेताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय. बद्रीनाथ आणि जोशी मठ दरम्यानच्या भागात शोध मोहिम सुरु आहे. हेलिकॉप्टरमध्ये सहालोक असल्याची माहिती आहे. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापक टीम्स बेपत्ता हेलिकॉप्टरचा शोध घेत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group