भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने १९८ धावा केल्या. खेळपट्टी आणि परिस्थितीचा विचार न करता ही धावसंख्या चांगली मानली जाते. पहिल्या दोन सामन्यांमध्ये न्यूझीलंडला लक्ष्याचा बचाव करण्यात अपयश आले होते. पण सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला होता. पण वेलिंग्टनच्या हेन्री स्टेडियमवर जे घडले, त्याची टीम इंडियानेही अपेक्षा केली नव्हती.
न्युझीलंडसाठी करो या मरो असलेल्या सामन्यात भारतीय संघाने न्युझीलंडचा सहा विकेट राखत पराभव केला. टीम इंडियानं या विजयासह मालिकाही आपल्या नावावर केली. न्यूझीलंडने दिलेल्या 199 रनच्या आव्हानाचा पाठलाग करायला आलेल्या टीम इंडियाच्या दोन्ही ओपनर्सनी पहिल्याच ओव्हरपासून वादळी सुरूवात केली.टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या ओव्हरमधला सर्वाधिक स्कोअर टीम इंडियाच्या ओपनर्स केला.
या सामन्यात टीम इंडियाने वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्माला ओपनिंगला पाठवलं, यानंतर दोघांनी जेकब डफीच्या पहिल्याच ओव्हरला तब्बल 26 रन काढल्या. यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये भारताने 17 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 21 रन काढल्या. अभिषेकनं अवघ्या 15 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तर पाच षटकात भारतीय संघानं 100 धावा पूर्ण केल्या होत्या. तर टीम इंडियाच्या ओपनर्सने सहा ओव्हर्सच्या पावरप्लेमध्ये 118 धावा कुठल्या होत्या. हा पावरप्लेमध्ये झालेला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील संघाने केलेला सर्वात मोठी धावसंख्या होती.
भारताच्या वेगवान धावसंख्येच्या पाठलागादरम्यान वैभव सूर्यवंशी बाद होणारा पहिला खेळाडू ठरला.त्याला मॅथ्यू फिशरने बाद केले. वैभवने 19 चेंडूंत 45 धावा केल्या. यात चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या टोकावर, अभिषेक शर्माने अवघ्या 35 चेंडूंत आपले चौथे टी-20 आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. शतक केल्यानंतर काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. अभिषेक शर्माने 38 चेंडूंत 113 धावा केल्या होत्या.