पुण्याच्या शिक्षक मतदारसंघातून भाजपं उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा मोठा विजय
पुण्याच्या शिक्षक मतदारसंघातून भाजपं उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा मोठा विजय
img
Nandini khandare More
 राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या 28 तासांपासून अद्यापही मतमोजणी सुरु आहे. मात्र 5 जागांपैकी एका जागेचा निकाल जाहीर झाला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातुन  भाजपचे कौस्तुभ गावडे यांचा विजय झाला आहे. 

अखेर पुण्याच्या शिक्षक मतदारसंघातून भाजपं उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे शिवसेना पुरस्कृत सचिन सानप यांचा पराभव केला आहे. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत काँग्रेसचे जयंत आसगावकर यांना बाद घोषित करण्यात आलं. 

कौस्तुभ गावडे यांना १८,३८५ मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिंदेसेनेच्या सचिन सानप यांना ११,९८३ मतं मिळाली. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत चुरशीची लढत झाली. कारण कौस्तुभ गावडे यांनी सचिन सानप आणि दत्तात्रय सावंत या दोघांचा दारूण पराभव करत विजय मिळवला. निकाल जाहीर होताच सचिन सानप यांनी नाराजी व्यक्त केली आणि अनेक गंभीर आरोप केले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group