महाराष्ट्राच्या  पोलीस प्रशासनात मोठा फेरबदल!  15 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी; पाहा संपूर्ण यादी
महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनात मोठा फेरबदल! 15 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी; पाहा संपूर्ण यादी
img
Nandini khandare More
महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनात मोठी खांदेपालट करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाकडून 15 IPS आणि RPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील पोलीस दलात महत्त्वाचे प्रशासकीय फेरबदल झाले आहेत. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली असून काही अधिकाऱ्यांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली झाली? कोणाला कोणती नवीन जबाबदारी मिळाली? जाणून घेऊया सविस्तर.

  महाराष्ट्रातील  आयपीएस आणि आरपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आल्या आहेत. या आदेशात ठाणे पोलीस दलातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. गृह विभागाने अधिकाऱ्यांना दिलेल्या या मुदतवाढीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.

महाराष्ट्रातील गृह विभागाने 2 नोव्हेंबर 2026 रोजी शासन आदेश जारी झाला. पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक एकच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आलाय. यात ठाणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त अमरसिंग जाधव आणि परमंडळ क्रमांक 5 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्यासह कोकण परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे शिवराज पाटील यांना एक वर्षांची मुतवाढ देण्यात आलीय. एसआयटी प्रमुख अमरसिंह जाधव ,उपायुक्त प्रशांत कदम यांची प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणामुळे एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मुदतवाढीमुळे संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीच्या पदावर आणखी एक वर्ष काम करण्याची संधी दिली आहे.

गृह विभागाच्या आदेशात अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांची बीडच्या अंबेजोगाईमध्ये बदली करण्यात आली आहे. ठाणे शहराच्या परिमंडळ क्रमांक 1 च्या पोलीस आयुक्त मिना मखवाना यांची ठाणे ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलीये. तर जयंत बजबळे यांची पोलीस उपायुक्त , ठाणे शहरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एकीकडे राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं बदल्यांचे सत्र सुरू आहे. दुसरीकडे ठाण्यातील अधिकाऱ्यांना एक वर्षांची मुदतवाढ चर्चेचा विषय ठरत आहे.

अधिकाऱ्यांची कोणत्या पदावरून कुठे बदली? 

विकास संपत नाईक, पोलीस उप अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नागपूर  – अपर उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई

संकेत सतीश गोसावी, पोलीस उप अधीक्षक, गुअवि, पुणे – उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग, रत्नागिरी

कुमार भिकाजी चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा उपविभाग, लातूर  – पोलीस उप अधीक्षक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक

सुधीर पुंडलिक नांदणवार,  प्रतीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी, तुमसर उपविभाग, भंडारा

संतोष वैरागडे,  सहायक पोलीस आयुक्त, दहशतवाद विरोधी पथक – उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव कॅम्प उपविभाग, नाशिक

श्रीकांत चंद्रकांत कांकाळ, पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बीड  – पोलीस उप अधीक्षक,अनुसूधचत जमाती प्रमाणपत्र पडताळणी सधमती, धकनिट, मुख्यालय छ.सांभाजीनगर

अनमोल मित्तल – अपर पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) – अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई, बीड

आकांक्षा यादव – उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग, रत्नागिरी – उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा, लातूर

संदीप जाधव – प्रतीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा, नांदेड

शिवराज पाटील – अपर पोलीस अधीक्षक, नांदेड एक वर्ष मुदतवाढ

अमरसिंग जाधव – पोलीस –  उप आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे शहर (एक वर्ष मुदतवाढ)

प्रशांत कदम – पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 5, ठाणे शहर (एक वर्ष मुदतवाढ )

मीना मखवाना–  अपर पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण), – पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1, ठाणे शहर

वैशाली ईश्वर कडुकर – अपर पोलीस अधीक्षक, सातारा – पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे

इतर बातम्या
Join Whatsapp Group