ज्या हिमालयाला भारताचा मुकुट म्हटलं जातं, त्याच हिमालयातून आता धोक्याची घंटा वाजू लागली आहे. चारधाम यात्रेतील महत्त्वाचं तीर्थक्षेत्र असलेल्या बद्रीनाथच्या भवितव्याबाबत एका नव्या संशोधनाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तापमानवाढ आणि हिमनद्यांमधील बदल यामुळे मोठ्या नैसर्गिक आपत्तीचा धोका निर्माण होऊ शकतो. हिमनद्यांचा बर्फ कोसळल्यास संपूर्ण परिसरात बर्फ आणि मलब्याचा प्रचंड लोंढा पसरू शकतो. या संकटाचा संभाव्य परिणाम शेकडो इमारतींवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना न केल्यास परिस्थिती गंभीर बनू शकते, असा इशारा संशोधनातून मिळतोय.
वाढतं औद्योगिकीकरण, वृक्षतोड यामुळे पर्यावरणात मोठा बदल होतोय. यामुळे पृथ्वीवरचं तापमानही वाढतंय. याच हवामान आणि पर्यावरण बदलाविषयी चिंता वाढवणारा अंदाज समोर आलाय. या नव्या अंदाजात भारतालाही महत्त्वाचा इशारा देण्यात आलाय. अशीच तापमानवाढ चालू राहिली तर भारतातील हिमनद्या वितळतील आणि मोठा जलप्रयल येईल, असा चिंता वाढवणारा इशारा देण्यात आलाय. विशेष म्हणजे या रिपोर्टपमध्ये समुद्राची पाणीपातळी वाढलेली आहे. कार्बनचे उत्सर्जन थांबवले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले आहे.
समुद्राची पाणीपातळी तब्बल 9 मिटरने वाढणार
तुर्कीमध्ये कॉन्फरन्स ऑफ पार्टीजची 31 वी परिषद होणार आहे. ही परिषद होण्याआधी इंटरनॅशनल क्रिस्टोफर क्लायमेट इनिशिएटीव्ह आणि युनायटेड नॅशनल एन्व्हायरमेंट प्रोग्राम या दोन संस्थांनी मिळून एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टनुसार ध्रुवीय प्रदेशाचे तापमान 0.1 टक्क्याने जरी वाढलं तर जगातील अर्ध्या हिमनद्या गायब होतील. या हिमनद्या वितळल्या तर समुद्राची पाणीपातळी तब्बल 9 मिटरने वाढेल. ही पाणीपातळी वाढली तर अर्धी जमीन जलमय होईल.
याच रिपोर्टमध्ये भारतातील हिमनद्यांविषयीही महत्त्वाचा इशारा देण्यात आलाय. बद्रीनाथमधील हिमनद्यांत भेगा पडत आहेत. त्यामुळे बर्फ तुटण्याची भीती आहे. ही भीती सत्यात उतरली तर बद्रीनाथमध्ये मोठा विध्वंस होऊ शकतो. अलकनंदा तसेच गंगा नदीमध्ये मोठा प्रलय येऊ शकतो, असे संकेतही या रिपोर्टमध्ये देण्यात आले आहेत.
समुद्राची पाणीतपाळी 27 सेंटीमिटरने वाढली
सध्या ध्रुवीय प्रदेशांची तपमानवाढ ही 1.4 अंश सेल्सिअसवर आहे. आता थोडी जरी तापमानवाढ झाली हिमनद्या वेगाने वितळायला लागतील. त्यानंतर बघता बघता अर्ध्या हिमनद्या गायब होतील. तसेच समुद्राची पाणीपातळी वाढेल. हवामान बदलामुळे हिमनद्यांची स्थिती सतत बदलत आहे. अंटार्कटिकामध्ये समुद्राची पाणीपातळी 27 सेमीने वाढली आहे. ही अशीच पाणीपातळी वाढत राहिली तर मानवी जीवनही संकटात सापडू शकते. त्यामुळे योग्य काळजी घ्यावी. तापमान बदलाकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहन केले जात आहे.