नाशिक : नाशिक शहरामधील नाशिक शहर विभाग १ अंतर्गत असलेल्या उपविभागातील ३३/११केव्ही कॅम्पस विद्युत उपकेंद्र येथून निघणाऱ्या सिटी १ आणि ३ या ११ केव्ही विद्युत वाहिनीवर देखभाल दुरुस्तीचे विविध कामे करण्यात येणार असल्याने शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत या वाहिनीवरील भागांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.
यामध्ये सिटी १ विद्युत वाहिनीवरील विकास कॉलनी, सत्त्या कॉलनी, उद्योग भवन, लवटे नगर, उंट्वाडी, उत्कर्ष नगर, पोलिस प्रशिक्षण केंद्र ,न्यायाधीश निवास, दल्युभाई पटेल कॉलनी, उषा किरण सोसायटी, क्रांती नगर, त्रिंबक रोड, संभाजी चौक, देनालक्ष्मी कॉलनी परिसर तसेच सिटी ३ विद्युत वाहिनीवरील महात्मा नगर, समर्थ नगर,पारिजात नगर, भोसला स्कूल परिसर,सावरकर नगर, शंकर नगर, निर्मल कॉलनी
याचा समावेश असेल.
देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वा वेळ लागल्यास त्यानुसार वीज पुरवठा सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग १ कडून करण्यात आले आहे.