चेक बाऊन्स प्रकरणात व्यापाऱ्याला ६ महिने सक्त मजुरी आणि ४.३१ लाखांचा दंड
चेक बाऊन्स प्रकरणात व्यापाऱ्याला ६ महिने सक्त मजुरी आणि ४.३१ लाखांचा दंड
img
दैनिक भ्रमर

लासलगाव :- द्राक्ष खरेदी करून त्याचा चेक बाऊन्स प्रकरणात पिंपळगाव (ब) येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी  अ. जे. पाटील यांनी आदित्य ॲग्रो एक्सपोर्ट्सचे प्रोप्रायटर संतोष बबन गवळी (रा. ओझर, ता. निफाड) यांना ६ महिन्यांची साधी कैद आणि ४ लाख ३१ हजार ११६ रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची संपूर्ण रक्कम तक्रारदार शेतकऱ्याला भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

कसब्यासुकेणे (ता. निफाड) येथील शेतकरी रामकृष्ण रंगनाथ शेवकर यांनी आरोपी संतोष गवळी यांना ५७.१७ क्विंटल द्राक्षे ५२ रुपये प्रति किलो दराने एकूण २,९७,२८४ रुपयांना विकली होती. या मालाच्या मोबदल्यात आरोपी गवळी याने बँक ऑफ महाराष्ट्र, ओझर शाखेचा चेक दिला होता. मात्र, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने ("Funds Insufficient") ३१ जुलै २०१९ रोजी हा चेक बाऊन्स झाला.  

​कायदेशीर नोटीस पाठवूनही रक्कमेची भरपाई न झाल्याने शेतकरी रामकृष्ण शेवकर यांनी ॲड. के. पी. खैरे यांच्यामार्फत पिंपळगाव न्यायालयात 'नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट'च्या (N.I. Act) कलम १३८ अंतर्गत खटला दाखल केला

 न्यायालयाचा निर्णय:
सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे पडताळल्यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अ. जे. पाटील यांनी आरोपीला दोषी ठरवले. मूळ रक्कम २,९७,२८४ रुपये, त्यावरील जून २०१९ पासून ऑगस्ट २०२६ पर्यंतचे ६% दराने व्याज (१,२७,८३२ रुपये) आणि कोर्ट फीचे ६,००० रुपये, असा एकूण ४,३१,११६ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास अतिरिक्त १ महिन्याचा कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group