नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पार्किंग परिसरात अचानक लिंबाचे झाड कोसळल्याची घटना घडली. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांवर झाड कोसळल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या दुर्घटनेत जवळपास ८ ते १० वाहनांचा चुराडा झाला असून, झाड कोसळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वाहनधारकांची धावपळ उडाली.
मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, कोसळलेले झाड हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
दरम्यान, झाड कोसळताच मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच घबराट पसरली. सुदैवाने, झाड पडले त्या क्षणी वाहनांमध्ये किंवा झाडाखाली कोणीही नागरिक उपस्थित नव्हते. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी वा दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ या घटनेमुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.