विधानपरिषदेच्या २८ जागांचे निकाल जाहीर झाले असून, या निकालांकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत कुठे भाजपने बाजी मारली, तर कुठे विरोधी पक्षांनी विजय मिळवत सत्ताधारी पक्षांना धक्का दिला. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटकमधील निकालांमुळे राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार विजयी झाला आणि कोणाला पराभवाचा सामना करावा लागला? पाहा २८ जागांवरील विजेत्यांची संपूर्ण यादी.
भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूर आणि वाराणसीमध्ये पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान देशभरात काँग्रेस २८ पैकी एका जागेवर निवडून आल्याने राजकारणात विविध चर्चा सुरु आहेत.
भाजपला काही राज्यांत फटका या निवडणुकीत भाजपला अनेक जागांवर यश मिळाले असले, तरी काही महत्त्वाच्या मतदारसंघांत पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. विशेषतः नागपूरमध्ये काँग्रेसने, तर वाराणसीमध्ये समाजवादी पक्षाने विजय मिळवला. त्यामुळे या निवडणुकीत भाजपसह अनेक मोठ्या नेत्यांना धक्का बसल्याचे चित्र आहे. या निकालातून शिक्षक आणि पदवीधर मतदारांनी काही ठिकाणी सत्ताधारी पक्षांविरोधात नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येते.
बिहार आणि कर्नाटकमध्येही वेगवेगळे निकाल बिहारमध्ये पदवीधर मतदारांनी सरकारच्या बाजूने कौल दिल्याचे चित्र दिसले, तर शिक्षक मतदारांनी विरोधकांना पाठिंबा दिला. त्यामुळे राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारांची भूमिका वेगवेगळी असल्याचे निकालातून स्पष्ट झाले. कर्नाटकमध्येही काँग्रेसला नाराजीचा सामना करावा लागला.
महाराष्ट्रात महायुती आणि विरोधकांची लढत महाराष्ट्रात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील निकालांनी राजकीय पक्षांचे लक्ष वेधले. काही ठिकाणी महायुतीला यश मिळाले, तर नागपूरमध्ये काँग्रेसने विजय मिळवत भाजपला धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटानेही दोन जागांवर विजय मिळवला. त्यामुळे पक्षाचा या निवडणुकीतील स्ट्राइक रेट शंभर टक्के राहिला. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी विरोधी पक्षांनीही काही महत्त्वाच्या मतदारसंघांत विजय मिळवला.
देशभरात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ?
भाजपला १३ जागांवर यश मिळाले - १३ (महाराष्ट्र-1, बिहार-3, उत्तर प्रदेश-6, कर्नाटक-3)
शिंदे सेनेला एका जागेवर यश मिळालं
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला २ जागांवर यश मिळालं
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये काँग्रेसची एका जागेवर बाजी
समाजवादी पक्षाला उत्तरप्रदेशात ५ जागेंवर यश मिळाले JDU पक्षाला १,
तर JDS पक्षाने कर्नाटकात एका जागेवर यश खेचून आणलं.
जनसुराज्य १, RJD १ तर अपक्ष २ ठिकाणी विजयी झाले.