सराफ बाजारात मोठा धमाका ! तब्बल 8 हजार रुपयांची घसरण ;वाचा आजचा सोने आणि चांदीचा भाव
सराफ बाजारात मोठा धमाका ! तब्बल 8 हजार रुपयांची घसरण ;वाचा आजचा सोने आणि चांदीचा भाव
img
Nandini khandare More


सोने-चांदी खरेदीचा विचार करताय? मग सराफा बाजारातील ताज्या घडामोडी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत! सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठे चढ-उतार सुरू असून, अलीकडील घसरणीमुळे ग्राहकांचं लक्ष पुन्हा एकदा बाजाराकडे लागलं आहे. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ८२० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली, तर चांदीच्या दरातही मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे दरांमध्ये पुन्हा बदल होत आहेत. त्यामुळे आज २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव किती? चांदीचा किलोचा दर काय आहे? जाणून घेऊया आजचे ताजे दर. 

आंतरराष्ट्रीय बाजारात घडत असलेल्या घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या दरात सतत बदल होत असल्याचे दिसत आहे. हे भाव अस्थिर असल्याचे चित्र आहे. चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्याचा आणि एक किलो चांदीचा भाव काय आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात आज किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीचे भाव हे चांगलेच आपटले आहेत.गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचे भाव जीएसटी सह 1 लाख 50 हजार 998 रुपयांवर पोहोचले आहेत.तर दुसरीकडे चांदीच्या दरात 8 हजारांची घसरण झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचे दर जीएसटी सह 2 लाख 16 हजार 300 रुपयांवर पोहोचले आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group