राज्यात उष्णतेचा तडाखा ! 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट
राज्यात उष्णतेचा तडाखा ! 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट
img
Nandini khandare More
राज्यात अनेक ठिकाणी आता पावसाने माघार घेतली असून हवामान विभागाच्या माहितीनुसार, मॉन्सूनने महाराष्ट्राच्या जवळपास निम्म्या भागातून माघार घेतली आहे.आज मुंबई, कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मॉन्सूनने महाराष्ट्राच्या जवळपास निम्म्या भागातून माघार घेतली आहे. 

येत्या दोन ते तीन दिवसांत मराठवाडा, विदर्भाचा बहुतांश भाग आणि राज्यातील आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्याचा शेवटचा टप्पा सुरू झाला असून, आता राज्यात तापमानाचा पारा हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज हवामान विभागाने कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवू शकतो. पश्चिम महाराष्ट्रासह पूर्व विदर्भातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

मध्य महाराष्ट्रातील सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा तसेच विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसादरम्यान नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे, राज्यातील उर्वरित भागात दिवसभर उन्हाचा चटका जाणवण्याबरोबरच वातावरणात उकाडाही वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मॉन्सूनच्या परतीचा वेग वाढत असताना राज्यात आता हवामानात झपाट्याने बदल होताना दिसत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group