मोठी बातमी ! डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द
मोठी बातमी ! डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द
img
Nandini khandare More
कल्याण-डोंबिवलीतील  डॉक्टर मारहाण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेत नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन रद्द केला आहे. न्यायालयाने त्यांना उद्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलिसांसमोर हजर होण्याचे निर्देश दिले आहेत. या मुदतीत त्यांनी शरणागती पत्करली नाही, तर त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात रमेश म्हात्रे यांच्या कायदेशीर अडचणी आणखी वाढल्या आहेत.

तसेच आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना संप मागे घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कल्याण डोंबिवलीचे डॉक्टर बंदमध्ये होणार सहभागी डोंबिवलीतील डॉक्टर मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ येत्या सोमवारी २४ तासांसाठी राज्यस्तरीय बंदची हाक देण्यात आली आहे. 

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिंदेसेनेचा नगरसेवक आणि समर्थकांकडून डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनने २० जुलैला 24 तासांसाठी राज्यस्तरीय बंद पुकारला आहे. या बंदमध्ये कल्याण डोंबिवलीतील डॉक्टरांच्या सर्व संघटना पूर्णपणे सहभागी होणार असल्याचे आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. राजेश राघव राजू यांनी सांगितले. मात्र, आता न्यायालयाने डॉक्टरांना संप मागे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यावर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group