आमिर खान होणारी पत्नी गौरी आणि दोन्ही Ex-Wifeसोबत एकाच कारमध्ये
आमिर खान होणारी पत्नी गौरी आणि दोन्ही Ex-Wifeसोबत एकाच कारमध्ये
img
Nandini khandare More

बॉलिवूड अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकनर असून रीना दत्ता आणि किरण राव यांना घटस्फोट दिल्यानंतर आमिर पुन्हा एकदा नवा संसार थाटण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या वर्षी त्याच्या ६०व्या वाढदिवशी त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची सर्वांना ओळख करून दिली होती. आता तो गौरीशी लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आमिर खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमिर खान एकाच गाडीत एक्स पत्नी आणि होणाऱ्या पत्नीसोबत दिसत आहे.


नुकतेच आमिर खानच्या ‘लगान’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या ग्रँड सेलिब्रेशनमध्ये ही अनोखी घटना घडली. कार्यक्रमानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमिर खान ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसलेला दिसत आहे, तर मागच्या सीटवर त्याची पूर्व पत्नी रीना दत्ता, किरण राव आणि होणारी पत्नी गौरी स्प्रॅट एकत्र बसून हसत-गप्पा मारताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत किरण आणि आमिरचा मुलगा आझादही उपस्थित होता. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.



इतर बातम्या
Join Whatsapp Group