धक्कादायक ! प्री स्कूलमध्ये 3 वर्षांच्या मुलाकडून दोन वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण
धक्कादायक ! प्री स्कूलमध्ये 3 वर्षांच्या मुलाकडून दोन वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण
img
Nandini khandare More
पालक आपल्या पाल्याला मोठ्या विश्वासाने प्री स्कूल आणि डे केअरमध्ये सोडत असतात. परन्तु अनेकदा लहान मुलांवर होणारे छळ  अनेकदा उघडकीस आले आहेत. दरम्यान आता पुन्हा एकदा अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे एका 3 वर्षांच्या मुलाकडून दोन वर्षाच्या मुलाला  बेदम मारहाण करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये  सिडको परिसरातील फर्स्टक्राय इंटेलिटॉट्स प्रीस्कूलमधील 23 महिन्यांच्या मुलाला तीन वर्षांच्या मुलानं बेदम मारहाण केल्याचा अतिशय धक्कादायक आणि पालकांना सावध करणारा प्रकार घडलाय. होय...तीन वर्षांच्या मुलानं दोन वर्षांच्या मुलानं बेदम मारहाण केलीय...हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. मात्र हे घडलंय प्री स्कूलमधल्या बेजबाबदार कर्माचाऱ्यांमुळे

समोर आलेल्या माहितीनुसार, संभाजीनगरातल्या नामांकित प्री स्कूलमध्ये पालकांनी 2 वर्षांच्या चिमुकल्याला सोडलं केअर टेकर मुलांना आत कोंडून बाहेरून दरवाजा लॉक करून निघून गेली त्यानंतर एका 3 वर्षांच्या मुलानं द चिमुकल्याच्या चेहरा, नाक, ओठ, छाती, पाठ आणि तळपायावर जखमा घटनेनंतरही मुलाला रुग्णालयात न नेल्याचा आरोप असून  23 महिन्यांच्या चिमुकल्याला तब्बल 45 मिनिटं मारहाण झाली, तेव्हा एकही शिक्षक तिथे उपस्थित नसल्याचं समोर आलंय. इतकंच नव्हे तर हे सगळं प्रकरण पोलिसांत गेल्यानंतर शाळा व्यवस्थापनानं केस मागे घेण्यासाठी 10 लाख रुपये आणि मुलाला 3 वर्षे मोफत शिक्षणाचं आमिष दाखवल्याचा गंभीर आरोप चिमुकल्याच्या पालकांनी केलाय.

 याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसात एकूण 7 जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेत. केवळ शाळा प्रशासनाचा बेजबाबदारपणाच नाही, तर मोठा बेकायदेशीर कारभारही समोर आलाय. या नामांकित प्रीस्कूलकडे महानगरपालिकेची कोणतीही आवश्यक परवानगी नसल्याची खळबळजनक माहिती समोर आलीये. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group