''या'' शहरातील १८ नामांकित शाळांना अचानक सुट्टी ! पालकांमध्ये भीतीचे वातावरण; नेमकं काय घडलं ?
''या'' शहरातील १८ नामांकित शाळांना अचानक सुट्टी ! पालकांमध्ये भीतीचे वातावरण; नेमकं काय घडलं ?
img
Nandini khandare More
नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर शहरातील १८ नामांकित शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली असून आता याचे धक्कादायक कारणही सामोर आले आहे. 

नागपूर शहरातील १८ नामांकित शाळा तसेच जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर आज खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व्यवस्थापनाकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोणत्याही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगत संबंधित शाळांच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

धमकीच्या ई-मेलमुळे खळबळ १९ ऑगस्ट रोजी नागपुरातील १८ प्रमुख शाळांना आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला एक संशयास्पद ई-मेल प्राप्त झाला होता. या ई-मेलमध्ये संबंधित इमारती बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीच्या ई-मेलमध्ये '३१ ऑगस्ट' या तारखेचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. यामुळे खबरदारी म्हणून शाळा प्रशासनाने आज विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला.

आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि तपास पोलीस तपासात हा धमकीचा ई-मेल बांगलादेश आणि फ्रान्स येथून पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. ई-मेल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने सर्व शाळांची आणि परिसराची बॉम्ब शोधक व नाशक पथकाद्वारे (BDDS) कसून तपासणी केली होती. या तपासणीत कोणतीही आक्षेपार्ह किंवा संशयास्पद वस्तू आढळून आली नव्हती.

पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर धमकीत नमूद केलेली तारीख आज असल्याने पोलीस प्रशासनाकडून कोणतीही रिस्क घेतली गेलेली नाही. सर्व १८ शाळांमध्ये आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांकडून सुरक्षेची कडक अंमलबजावणी केली जात आहे. पोलिसांनी पालकांनी आणि नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group