डिलिमिटेशन विधेयकावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या घडामोडींना वेग आला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या विधेयकाला पाठिंबा दिल्याची भूमिका समोर आली असतानाच, एका बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या भूमिकेचे पडसाद आता पक्षांतर्गत उमटू लागले आहेत. पक्षाने मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानंतर पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नाराजीला सुरुवात झाली आहे. सोशल मीडिया फ्रंटचे प्रदेश सरचिटणीस रामेश्वर खामकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामापत्रात पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.