शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय! सर्व खासदारांना व्हिप जारी; काय आहे नेमकं कारण?
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय! सर्व खासदारांना व्हिप जारी; काय आहे नेमकं कारण?
img
Nandini khandare More
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेत पक्षातील सर्व खासदारांना तातडीने व्हिप जारी केला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पक्षाने खासदारांना नेमके कोणते निर्देश दिले आहेत? व्हिप जारी करण्यामागचे कारण काय? जाणून घेऊया सविस्तर...

राज्यासह केंद्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. केंद्र सरकारने ३० नोव्हेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनामध्ये डिलिमिटेशन बिल सादर केले जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संसदेच्या अधिवेशनासाठी सर्वा खासदारांना व्हिप जारी केला आहे. या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पक्षाचे मुख्य प्रतोद खासदार अमोल कोल्हे यांनी हा व्हिप जारी केला आहे.

डिलिमिटेशनच्या विधेयकासाठी विशेष अधिवेशन दिल्लीत बोलावण्यात आलं आहे. ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत हे अधिवशेन होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून व्हीप जारी करत सर्व खासदारांना सभागृहात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासोबत पक्ष जी भूमिका घेईल त्याला सर्व खासदारांनी पाठींबा द्यावा असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत चर्चा देखील झाली असल्याची माहिती आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत प्रत्येक जिल्हाध्यक्षांची मतं जाणून घेतली. शरद पवार घेतील तो निर्णय मान्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. बहुतेक जिल्हाध्यक्षांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या बाजूने कल सकारात्मक आहे. राज्यातील अनेक मतदारसंघातील लोकसंख्या जास्त असल्यामुळे मतदारसंघाच विभाजन होणे गरजेच असल्याचं मत व्यक्त करण्यात आले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group