मोठी बातमी ! राहुल गांधी यांच्या ताफ्याचा अपघात; ५ गाड्या आणि रुग्णवाहिकेची धडक
मोठी बातमी ! राहुल गांधी यांच्या ताफ्याचा अपघात; ५ गाड्या आणि रुग्णवाहिकेची धडक
img
Nandini khandare More
आताची एक मोठी बातमी समोर आली आहे.राहुल गांधी यांच्या ताफ्याचा अपघात झाला असल्याची महिती समोर येत आहे. उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्सप्रेस-वेवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या ताफ्याचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात राहुल गांधी पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.  मिळालेल्या माहितीनुसार, एक्सप्रेस-वेवरून ताफा जात असताना अचानक गाड्या एकमेकांवर आदळल्या. या दुर्घटनेत ताफ्यातील ५ गाड्या आणि एका रुग्णवाहिकेची आपसात जोरदार धडक झाली.

ताफा वेगात असताना गाड्या एकमेकांवर आदळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गाड्या एकमेकांवर धडकल्याने वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. अपघातानंतर ताफ्यातील सुरक्षा रक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने परिस्थिती हाताळली.घटनेनंतर सुरक्षेची पाहणी करून राहुल गांधी यांचा ताफा पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आला आहे. पोलीस या अपघाताचे नेमके कारण काय होते, याचा अधिक तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group