उद्धव ठाकरेंनी घेतली पूर्णेकरांच्या कुटुंबीयांची भेट ! म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी घेतली पूर्णेकरांच्या कुटुंबीयांची भेट ! म्हणाले...
img
Nandini khandare More
ठाण्यातील ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घनटेने महाराष्ट्रभर एकच खळबळ उडाली आहे. आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे आश्वासन त्यांनी  पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांना दिले.

उद्धव ठाकरे यांनी पुर्णेकर कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीत आम्ही पूर्णेकरांच्या कुटुंबीयांसोबत आहोत, असे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी मिलिंद नार्वेकर, राजन विचारे, मनसेचे नेते अविनाश जाधव हे नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पुर्णेकर यांच्यासोबत संवाद साधला. या प्रकरणात लवकरात लवकर चार्जशीट दाखल झाली पाहिजे. मिनाक्षी शिंदे यांच्या नावाचाही त्यात उल्लेख हवा. संजय राऊत आल्यामुळे FIRमध्ये त्यांच नाव आलं. अगोदर ते नाव घेत नव्हते, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

या प्रकरणातील आरोपांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच या घटनेत लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करावे. पूर्णेकर कुटुंबाला योग्य नाय मिळवून देणार, असे आश्वासनही यावेळी ठाकरे यांनी दिले. या संवादात पूर्णेकर कुटुंबीयांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित असताना न्याय हवा अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच पूर्णेकर अमर रहे अशा घोषणाही देण्यात आल्या.
इतर बातम्या
Join Whatsapp Group