मोठी खळबळ  ! ''या'' मंत्र्याच्या बंगल्याला भीषण आग
मोठी खळबळ ! ''या'' मंत्र्याच्या बंगल्याला भीषण आग
img
Nandini khandare More
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंत्री गणेश नाईक यांच्या बंगल्याला अचानक भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, बंगल्यातील एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काही वेळातच आग आटोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र, आगीमुळे बंगल्याचे किती नुकसान झाले आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सुरू आहे. एसीमधील शॉर्ट सर्किट हेच आगीचे कारण आहे का, याचीही चौकशी केली जाणार आहे. या घटनेबाबत अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group