खळबजनक ! राष्ट्रवादीच्या बड्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी
खळबजनक ! राष्ट्रवादीच्या बड्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी
img
Nandini khandare More
राज्याच्या राजकारणातून एक  खळबळजनक घटना समोर आली आहे. राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास आमदार नायकवडी यांचा विरोध आहे. एवढेच नव्हे तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून त्यांनी या कायद्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहनही केले होते. यावरूनच, समान नागरी कायद्यास विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

खळबजनक ! राष्ट्रवादीच्या बड्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी

याप्रकरणी आमदार नायकवडी यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, आमदार नायकवडी यांना मिळालेल्या या धमकीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पत्र कुणी पाठवले? याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group