देशातील राजकरणात सध्या मोठया हालचालींना वेग आला असून आता मोठे राजकीय भूकंप होत आहेत. आता पुन्हा एकदा
एक मोठी अपडेट समोर आली आहे. आज मेघालयच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून युनायटेड डेमोक्रेटिक पार्टीचे आठ आमदारांनी कमळ हाती घेत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू आणि भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा उपस्थित होते.
मेघालयमध्ये सध्या नॅशनल पीपल्स पार्टीच्या नेतृत्वाखाली मेघालय डेमोक्रॅटिक अलायन्सची (MDA) सत्ता आहे. कॉनरोड के. संगमा हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, 60 सदस्यांच्या विधानसभेत NPP हा सर्वात मोठा पक्ष आहे. या आघाडी सरकारमध्ये UDP आणि भाजप हे दोन्ही पक्ष सहभागी आहेत. आठ आमदारांच्या भाजप प्रवेशाआधी P हा MDAमधील दुसरा सर्वात मोठा पक्ष होता. मात्र, आता भाजपची आमदारसंख्या UDPपेक्षा जास्त झाली आहे.