राजकरणात मोठी उलथापालथ ! ठाकरेंसह शरद पवारांना मोठा दणका; बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
राजकरणात मोठी उलथापालथ ! ठाकरेंसह शरद पवारांना मोठा दणका; बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
img
Nandini khandare More
सध्या राजकरणात मोठी खलबत सुरु असून शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून दुसरीकडे मात्र आता शिंदे गटाकडून , ठाकरे गटासह शरद पवारांनाही  मोठा धक्का बसला आहे.  शिंदे गटातील इनकमिंग जोरात सुरू आहे. आज ठाण्यात शिंदे गटाचा कार्यक्रमात भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिंदेंनी ठाकरे गट आणि शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार दणका दिलाय. ठाण्यातील शिवसेनेच्या कार्यक्रमात ठाणे, वसई, विरारसह विविध ठिकाणच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश केलाय.

ठाण्यातील मातोश्री गंगुबाई शिंदे हॉल येथे हा पक्ष प्रवेश पार पडला. येथे ठाकरे गट आणि शरद पवार गट राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींचा आणि शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय. शरद पवार गटाच्या पालघर महिला जिल्हा अध्यक्षा मेघा म्हात्रे यांच्यासह रुपेश डोले श्रमजीवी महाराष्ट्र राज्य संघटक पालघर उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांनीही शिवसेनेत प्रवेश केलाय.

शिवसेना ठाकरे गटाचे नालासोपारा परिसरातील उपविभाग प्रमुख , विधानसभा उप - संघटक, शाखा प्रमुख, युवासेना - पदाधिकारी यांनीही शिंदे गटात प्रवेश केलाय. यांच्यासह कांदिवलीतील ठाकरे गटाचे 25 पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केलाय. मुंबई उपनगरचे अपक्ष उमेदवार प्रमोद शिवाजी पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष मोहद मलिक यांनी शिंदे गटात प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतलंय. जालना जिल्ह्यातील शरद पवार गटाचे माजी सरपंच दत्ता पाटील खोजे, मार्केट समिती संचालक उपअध्यक्ष यांनी पदाधिकारी सोबत शिवसेना पक्षात केला जाहीर प्रवेश केलाय.
इतर बातम्या
Join Whatsapp Group