मोठी बातमी !  पहलगाम हल्ल्यातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा खात्मा
मोठी बातमी ! पहलगाम हल्ल्यातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा खात्मा
img
Nandini khandare More
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या एका मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेला मूसा गेल्या काही वर्षांपासून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता.  मंगळवारी रात्री राष्ट्रीय रायफल्स आणि इतर सुरक्षा दलांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या कारवाईत सुलेमान शाह उर्फ ‘मूसा’ ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.


पीर पंजाल पर्वतरांगांच्या दोन्ही बाजूंना झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे सुरक्षा दलांसाठी तो अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी कोराग आणि यूसमर्ग परिसरात संयुक्त मोहिम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान जवानांना संशयास्पद हालचाली आढळून आल्या. त्यानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आणि सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली.वन क्षेत्र असलेल्या दूधपथरी परिसरात ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरक्षा दलांचं अभियान सुरू होतं. परिसरात आणखी दहशतवादी लपून बसले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांकडून तपासणी आणि शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group