अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक ! कृष्णा मुखर्जी यांचं निधन; 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक ! कृष्णा मुखर्जी यांचं निधन; 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
img
Nandini khandare More
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीला  मातृशोक झाला असून राणीच्या  आईचं निधन झालं. कृष्णा मुखर्जी यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यश राज फिल्म्सने मंगळवार 22 सप्टेंबर रोजी या दु:खद वृत्ताला दुजोरा दिला. या शोकाकुल क्षणी कुटुंबियांच्या प्रायव्हसीचा आदर राखावा अशी विनंती करण्यात आली आहे. राणी मुखर्जीच्या आईचं  निधन कशामुळे झालं, ते कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

यश राज फिल्म्सने एक निवेदन जारी केलं आहे. ” अत्यंत दुःखद अंतःकरणाने आम्ही ही माहिती देत आहोत की, राणी मुखर्जी यांच्या आई, 75 वर्षीय श्रीमती कृष्णा मुखर्जी यांचे आज दुपारी निधन झाले. कुटुंबीय तुमच्या प्रेम, प्रार्थना आणि पाठिंब्याबद्दल अत्यंत आभारी आहेत. या दुःखाच्या प्रसंगी कृपया कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करावा, ही नम्र विनंती.” असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.

कृष्णा मुखर्जी या आधी पार्श्वगायिका होत्या. त्यांचा विवाह चित्रपट निर्माते राम मुखर्जी यांच्याशी झाला. राम मुखर्जी हे फिल्मालय स्टुडिओजच्या सहसंस्थापकांपैकी एक होते. 2017 साली राम मुखर्जी यांचं निधन झालं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group