मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना सत्र न्यायालयाने ठोठावला दंड; नेमके काय  प्रकरण ?
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना सत्र न्यायालयाने ठोठावला दंड; नेमके काय प्रकरण ?
img
Nandini khandare More
रितू तावडे यांना न्यायालयाने झटका दिला आहे. 2016 मधील एका शिक्षक मारहाण प्रकरणी सातत्याने कोर्टाच्या सुनावणीला गैरहजर  राहिल्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना 300 रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. 

 गेल्या सुनावणीस त्या उपस्थित न राहिल्याने शेवटची संधी म्हणून त्यांना वैयक्तिक उपस्थितीतून सूट देण्यात आली होती. मात्र त्यानंतरच्याही सुनावणीत रितू तावडे आणि अन्य काही आरोपी कोर्टात गैरहजर राहून वारंवार उपस्थितीतून सूट मिळण्यासाठी अर्ज दाखल करत असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.

न्यायालयात उपस्थितीतून सूट मिळण्यासाठी रितू तावडे यांनी नव्याने दाखल केलेला अर्ज मंजूर करतानाच सत्र न्यायालयाने प्रत्येकी 300 रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. २९ जुलै २०२६ रोजी वाकोला येथील महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत शिक्षकाला मारहाण प्रकरणी रितू तावडे आणि अन्य सात जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता.

याप्रकरणी आरोप निश्चिती झाली असून साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सध्या सत्र न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात रितू तावडे यांनी न्यायालयीन सुनावणीस अनुपस्थित राहण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला होता. हा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आणि या प्रकरणातील तिन्ही आरोपींवर तीनशे रुपयांचा दंड सुनावला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group