मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजकीय वातावरण तापलं आहे. केंद्र सरकारला बॅकफूटवर नेणाऱ्या सीजेपीनं आता मुख्य निवडणू आयुक्तांना ४८ तांसाचा अल्टीमेटम दिलाय.तसेच, मागणी मान्य न झाल्यास देशभर आंदोलन करण्याचा इशाराही पक्षाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
एसआयआर संदर्भात निवडणूक आयोगाच्या आयुक्तांमध्ये मतभेद असल्याच्या वृत्तांचा हवाला देत अभिजीत दीपकेंनी "ज्ञानेश कुमार हे या देशाचे सर्वात मोठे गद्दार आहेत. ते राष्ट्रद्रोही असल्याचं म्हटलंय.
एसआयआरच्या माध्यमातून देशातील 13 कोटींहून अधिक मते रद्द करण्यात आली आहेत. लोकांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवले जातंय. लोकशाही म्हणजे लोकांनी सरकार निवडणे, पण ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यापासून, कोण मतदान करेल आणि कोण नाही हे सरकार ठरवत असल्याच दीपके म्हणाले. ही लोकशाही आहे का? तुम्ही लोकशाहीची संपूर्ण व्याख्याच बदलली आहे. ही लोकशाही नसून हुकूमशाही असल्याचंही दीपके म्हणाले.