पाकिस्तानमधून एक मोठी बातमी आलीआहे. पाकिस्तानमध्ये मोठी दुर्घटना घडली असून दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. समोर आलेलया माहितीनुसार , पाकिस्तान मधील तेथील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान शहरात जोरदार स्फोट झाला आहे. या घटनेत 11 जणांनी जीव गमावला.
एका या वृत्तानुसार, या स्फोटात 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलिस चेकपोस्टवर झाल्याची माहिती समोर आली आहे.या स्फोटाची जबाबदारी हरीक-ए-तालिबान पाकिस्तानने घेतली आहे. एका रिपोर्टनुसार हा आत्मघाती हल्ला होता.