गणपती विसर्जनावेळी एक दुर्दैवी घटना घडली आहे. गणरायांचा निरोप दोन जनांसाठी शेवटचा ठरला आहे. नांदेडमध्ये गणरायाचे विसर्जन करताना इंडिनिअरिंगच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
नांदेड शहरातील काळेश्वर येथे गोदावरी नदीत बुडून २ तरुणांचा मृत्यू झाला. गणेश विसर्जनासाठी हे तरुण तिथे गेले होते. पोहण्यासाठी ते नदीत उतरले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. दोन्ही तरुण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होते. देगलूर तालुक्यातील किनी येथील १९ वर्षीय बजरंग येडूरे आणि मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील २० वर्षीय दीपक सोळूंखे अशी मृत तरुणाची नावे आहेत.
नांदेड शहराजवळच्या वाडी पाटी येथील मातोश्री प्रतिष्ठान महाविद्यालय येथे हे दोन्ही तरुण इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते. रविवारी ते आपल्या मित्रांसोबत गणरायाला निरोप देण्यासाठी आले होते. गणरायाच्या विसर्जनासाठी काळेश्वर येथे गोदावरी नदीत ते पोहण्यासाठी उतरले खरे पण पुन्हा बाहेर आले नाहीत. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले. दोघांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.