पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर भीषण हल्ला !
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर भीषण हल्ला !
img
Nandini khandare More
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पाकिस्तानकडून अफगाणिस्तानच्या कुनार आणि पक्तिका प्रांतांमध्ये हवाई हल्ले करण्यात आल्याचा दावा आहे. या हल्ल्यांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाल्याचे अफगाण अधिकाऱ्यांनी म्हटले असून, पाकिस्तानने दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केल्याचे स्पष्ट केले आहे.

लढाऊ विमानांतून कूनार प्रांतात हल्ला केला आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी सैन्याने नर्गल जिल्ह्याला टार्गेट केलं. नूर मोहम्मदच्या घरावर निशाणा साधला. पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमानातून कुनार प्रांताव्यतिरिक्त पक्तिका भागातही हल्ले केले आहेत. पाकिस्तानचे लढाऊ विमान आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अफगाणिस्तावर घिरट्या घालत होते. लढाऊ विमानांच्या आवाजाने नागरिक भयभीत झाले. पाकिस्तानच्या हल्ल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानच्या लढाऊ विमानाने एका घराला टार्गेट केलं. या हल्ल्यात घराच्या भिंती पडल्या आहेत. पाकिस्तानने नेमकं याच घराला लक्ष्य का केलं, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. लढाऊ विमानातून केलेल्या हल्ल्यामुळे इतर घरांचंही नुकसान झालं आहे. या हल्ल्यानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या वस्तू शोधण्यासाठी नागरिकांनी शोधाशोध सुरू केली होती. या ढिगाऱ्यात बॉम्बचे अवशेष देखील सापडले आहेत. या घरात किती लोक होते, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ड्युरँड लाइन आणि तहरीक-ए-तालिबानवरून वाद सुरू आहे. मागील वर्षांपासून दोन्ही देशात वाद सुरू आहे. एकेकाळी दोन्ही देशांचे व्यापारी संबंध चांगले होते. परंतु आता दोन्ही देशांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये 2640 किलोमीटवर लांबीची सीमा आहे. या सीमेला ड्युरँड लाइन म्हणून संबोधले जाते. 1893 साली इंग्रजांनी सीमा रेषा तयार केली होती. परंतु अफगाणिस्तान सरकार या सीमा रेषेले अधिकृत म्हणून मानत नाही. या सीमारेषेमुळे पश्तून आणि बलुच जमातीचे प्रदेश विभाजित होत आहे, असा अफगाणिस्तानचा आरोप आहे.

पाकिस्तानच्या आरोपानुसार, अफगाणिस्तान हे तहरीक-ए-तालिबानच्या दहशतवाद्यांना आश्रय देतंय. हे दहशतवादी पाकिस्तानात हल्ले करून दहशत निर्माण करत आहे. पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र असल्याचा अफगाणिस्तानचा आरोप फेटाळून लावला आहे. तर पाकिस्तान हे स्वत:चं अपयश झाकण्यासाठी अफगाणिस्तानला दोष देत असल्याचा आरोप केला जात आहे. या वादामुळे पाकिस्ताने टीटीपीचे तळ नष्ट करण्याचा निर्धार केलाय. यासाठी त्यांनी काबूल, पक्तिया आणि कुनारला लक्ष्य केलंय. या हल्ल्यामुळे नागरिकांचं नुकसान होत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group