मोठी बातमी ! आमदार प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील  कारचा  अपघात ; फ्री वे वर वाहनांना धडक
मोठी बातमी ! आमदार प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील कारचा अपघात ; फ्री वे वर वाहनांना धडक
img
Nandini khandare More

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधान परिषदेतील आमदार प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील एका वाहनाला ईस्टर्न फ्री वे र भीषण अपघात झाला आहे.मुंबई भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील कारला अपघात झाला आहे. अपघाताची तीव्रता कमी होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मुंबईतील फ्रीवेवरून त्यांचा ताफा जात असताना अपघात झाला. या घटनेत प्रवीण दरेकर हे सुखरूप असल्याची माहिती आहे. दरेकरांच्या ताफ्यातील एका कार आणि टॅक्सीची धडक झाली. या अपघातात दोन्ही कारचे किरकोळ नुकसान झालं. अपघातानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली. अपघातानंतर प्रवीण दरेकर देखील त्यांच्या कारमधून बाहेर आले.

प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील अपघात झाल्यानंतर व्हिडिओ समोर आला आहे. अपघात झाल्यानंतर प्रवीण दरेकर स्वत: पाहणी करण्यासाठी उतरले. त्यांच्यासोबत त्यांचे खासगी सुरक्षारक्षक देखील होते. या व्हिडिओमध्ये प्रवीण दरेकरांचा प्रकृती व्यवस्थित असल्याचे दिसत आहे. त्यांच्या ताफ्यातील कार आणि टॅक्सीची धडक झाली, त्यामुळे ही घटना घडली. या घटनेत प्रवीण दरेकर हे सुखरूप आहेत. या अपघातानंतर दरेकरांच्या ताफ्यातील अनेक कारचं नुकसान झाल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर टॅक्सीचं देखील नुकसान झालं आहे. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group