राजकारणातील मोठ्या हालचालींना वेग आला असून आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यात अजित पवार राष्ट्रवादीला हादरा बसला आहे. मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सहा सदस्य अपात्र ठरले आहेत. त्यामुळं मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. ग्रामपंचायतीचा कर थकवल्यानं अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. मात्र भाजपने षडयंत्र रचल्याचा आरोप अपात्र सदस्यांनी केला आहे. सदस्य अपात्र करण्यापूर्वीपर्यंत भाजे ग्रामपंचायतीत सरपंचासह अजित पवार राष्ट्रवादीचे सात जण तर भाजपचे तीन सदस्य असं राजकीय बलाबल होतं. मात्र आता अजित पवार राष्ट्रवादीचे सरपंच आणि पाच सदस्य अपात्र ठरल्याने भाजपचे तीन आणि अजित पवार राष्ट्रवादीचा अवघा एक सदस्य असं समीकरण उरलं आहे. त्यामुळं आता भाजेमध्ये नेमकी सत्ता कोणाची स्थापन होणार? याची उत्सुकता सर्वांनी लागलीये. ग्रामसेवकांनी अपात्रतेचा निकाल प्राप्त झाल्याची अधिकृत पुष्टी केली आहे.
भाजे ग्रामपंचायतीत एकूण नऊ ग्रामसदस्य आणि एक सरपंच अशी रचना आहे. यामध्ये सरपंचासह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सात सदस्य, तर भाजपचे तीन सदस्य होते. मात्र, ग्रामपंचायत कराची थकबाकी विहित मुदतीत न भरल्याच्या प्रकरणात सरपंच प्रिया अमित ओव्हाळ, उपसरपंच कोमल किरण केदारी, विकास बबन वाल्हेकर, प्रमोद विजय डगळे, सारिका विश्वनाथ पदमुळे आणि कविता अशोक चौरे या सहा जणांवर अपात्रतेची कारवाई झाली आहे. प्रताप कैलास गरवड आणि शेखर चंद्रकांत दळवी यांनी याबाबत विवाद अर्ज दाखल केला होता.
त्यावरील सुनावणीनंतर अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी अपात्रतेची कारवाई केली. भाजपने षडयंत्र रचल्यानं ही कारवाई झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता या आदेशानंतर अपात्र सदस्य अपील करु शकतात. त्यानंतर स्टे आला तर हे सदस्य सुनावणी पूर्ण होईपर्यंत पदावर राहतील. मात्र अपील न केल्यास अन् त्यावर स्टे न आल्यास सत्तेचं समीकरण कसं असेल? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. सध्या बहुमत अल्पमतात आहे, त्यामुळं एकतर तातडीनं प्रशासक नेमावा लागणार आहे, तसेचं त्यानंतर पोटनिवडणुक लागेल. या पोटनिवडणुकीनंतर मतदार राजा ज्याला कौल देईल, त्याची सत्ता स्थापन होणार आहे.
ग्रामपंचायत कराची थकबाकी विहित मुदतीत न भरल्याच्या प्रकरणात सरपंच प्रिया अमित ओव्हाळ, उपसरपंच कोमल किरण केदारी, विकास बबन वाल्हेकर, प्रमोद विजय डगळे, सारिका विश्वनाथ पदमुळे आणि कविता अशोक चौरे या सहा जणांवर अपात्रतेची कारवाई झाली आहे. प्रताप कैलास गरवड आणि शेखर चंद्रकांत दळवी यांनी याबाबत विवाद अर्ज दाखल केला होता.