पुण्यातील गणेशोत्सवात डीजेच्या दणदणाटाला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर आज, गुरुवारी झालेल्या हल्ल्याच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्रालयाकडून गंभीर दखल घेतली आहे.
गणेशोत्सवात लाऊडस्पीकर आणि डीजेला विरोध करणारे विद्यानंद बापट यांना आज पुण्यात मारहाण झाली होती. या मारहाणीच्या घटनेची गृह मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार विद्यानंद बापट यांना तातडीने पोलिस संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे बापट यांच्यासोबत पोलिस संरक्षण असणार असल्याची माहिती पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती समोर आल्यानंतर सरकारकडून तातडीने हालचाली करण्यात आल्या आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस बंदोबस्त देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या संदर्भात पुणे महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी विद्यानंद बापट यांना यापुढे पोलिस संरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सरकारने गंभीर दखल घेतली असून, त्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.