मनोज जरांगेंनी केली मोठी  घोषणा ! आता सरकारपुढे मोठे आव्हान; नेमकं काय म्हणाले ?
मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा ! आता सरकारपुढे मोठे आव्हान; नेमकं काय म्हणाले ?
img
Nandini khandare More
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी पुन्हा मैदानात उतरले आहेत. अंतरवाली सराटीकडे मराठा बांधवांनी धाव घेतली आहे.  मराठवाडा, गोदापट्टाच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मराठा समाज जालना जिल्ह्याकडे येत आहे. याच दरम्यान आता जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे. मागण्या मान्य कराव्यात नाही तर मुंबईत आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे. ‘वर्षा’ वर आंदोलन करण्याची इच्छाही त्यांनी यापूर्वीच बोलून दाखवली आहे. आता मुंबईत किती मराठे दाखल होतील याचा आकडाच त्यांनी सांगितला आहे. यामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशाही स्पष्ट केली. मुंबईला 45 लाख गाड्या येणार आहेत. आम्ही मुंबईला जाण्याची तयारी केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणून बुजून करत आहेत आणि त्याला छुपा पाठिंबा हा एकनाथ शिंदे यांचा आहे असा आरोपही जरांगे यांनी केला. मंत्री संजय शिरसाट यांच्या माध्यमातून ते करत आहेत, असे ते म्हणाले. आम्ही जो पर्यंत मागणी मान्य होत नाही तो पर्यंत हलणार नाही . चर्चा करायला कधी ही या ना काय अडचण आहे आम्ही मात्र हलणार नाही. यांना मराठ्यांच्या पोरांच चांगलं होवू द्यायचं नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

येत्या काही दिवसात तोडगा निघाला नाही तर अंतरवाली सराटी येथून मराठा बांधव मुंबईकडे कूच करतील असे जरांगे पाटील यांनी अगोदरच सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलनाची भाषा त्यांनी यापूर्वीच केली आहे. आता त्यांनी मुंबईत येण्याची किती तयारी झाली आहे, याची आकडेवारी समोर आणली आहे.

एक महिन्याचे साहित्य घेऊन आंदोलक अंतरवालीच्या दिशेने रवाना

बीडच्या पाटोदा तालुक्यातील मराठा बांधव एक महिन्याचे साहित्य घेऊन अंतरवालीच्या दिशेने रवाना झाले. पाटोदा तालुक्यातील दासखेड गावातुन चार पिक अप घेऊन मराठा बांधव रवाना झाले आहेत. अंतरवाली नंतर मुंबई ला जाण्याची तयारी असल्याचे मराठा बांधवांनी सांगितले. एक महिन्याचे राशन घेऊन निघालो आहोत, नोंदी असून प्रमाणपत्र दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

इतर बातम्या
Join Whatsapp Group