समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि कंटेनरचा भीषण अपघात !  एकाचा मृत्यू, 10 गंभीर जखमी
समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि कंटेनरचा भीषण अपघात ! एकाचा मृत्यू, 10 गंभीर जखमी
img
Nandini khandare More

समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे सत्र सध्या सतत सुरु असून आता आणखी एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने पुढे जात असलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात हेमंत हरिश्चंद्र दाभाडे (वय 65) यांचा मृत्यू झाला आहे. तर ट्रॅव्हल्समधील दहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 


अपघातानंतर महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी प्रवाशांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.भरधाव वेगामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वेग आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group