...तर थेट राजीनामा? मंत्री प्रताप सरनाईक-नरेंद्र मेहता वाद पेटला; नेमकं प्रकरण काय ?
...तर थेट राजीनामा? मंत्री प्रताप सरनाईक-नरेंद्र मेहता वाद पेटला; नेमकं प्रकरण काय ?
img
Nandini khandare More
सध्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून आता मिरा-भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये शहरातील नाट्यगृह आणि कलादालनावरून जोरदार जुंपली आहे. मिरा-भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी परिवहन मंत्र प्रताप सरनाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहाच्या दुरावस्थेवरून दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाला. आता बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या वाढलेल्या खर्चावरून आमदार मेहता यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बाळासाहेब ठाकरे कलादालन 39 कोटी रुपयांचं असताना खर्च हा 160 कोटी रुपयांवर कसा गेले, असा सवाल मेहता यांनी मंत्री सरनाईक यांना केला. 40 हजार चौरस फुटांच्या कलादालनासाठी इतका खर्च कसा झाला, याचं उत्तर जनतेला मिळालं पाहिजे, असा सवाल करत दोन्ही नेते आमनेसामने आले आहेत. 

प्रताप सरनाईक यांनी नरेंद्र मेहतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.  भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर आमदार नरेंद्र मेहता यांनी राजीनामा देणार असल्याचे म्हटलं होते, ‘नरेंद्र मेहता यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्या मंत्र्यांनी सिद्ध केले आहेत. त्यांनी राजीनामा दिला तर मिरा भाईंदरमध्ये दिवाळीपेक्षा मोठी दिवाळी साजरी होईल. ही दिवाळी लोक साजरी करतील. माझी गरजही लागणार नाही’. अशी टीका मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.


मिरा-भाईंदरमधून मराठी माणसांना हद्दपार करण्याचा डाव रचला जात आहे, या आरोपावर सरनाईक म्हणाले, आदिवासींच्या जमिनी लाटणे. भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवणे, असे प्रकार सर्वसामान्य मराठी माणसांच्या नशिबी येत आहेत. त्यामुळे मिरा-भाईंदरमधून मराठी माणसांना हद्दपार करण्याचा डाव आहे का, असा प्रश्न पडतो. मिरा-भाईंदरमधील सर्वसामान्य मराठी माणूस, भूमीपूत्र, आदिवासी फक्त 18 टक्के आहेत. 18 टक्के लोकांना कचाट्यात सापडून गुन्हे दाखल करून हद्दपार करण्याचा प्रयत्न करत असेल, मंत्री प्रताप सरनाईक कदापी सहन करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यांवर शिवसेनेची स्थापना केली. हिंदूत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना फोफावत गेली. त्यामुळे या मुद्द्यासाठी झगडत आहोत. ते काम करत राहू. आम्ही मराठी माणसांना हद्दपार होऊ देणार नाही’.
इतर बातम्या
Join Whatsapp Group