अभिजीत दीपकेंना  महाराष्ट्रात मोठा धक्का ! सीजेपी कार्यकर्त्यांवर थेट गुन्हे दाखल
अभिजीत दीपकेंना महाराष्ट्रात मोठा धक्का ! सीजेपी कार्यकर्त्यांवर थेट गुन्हे दाखल
img
Nandini khandare More
आता cjp ने  'स्कूल ठीक करो' हे अभियान हाती घेतलंअसून अभियानांतर्गत कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते शाळांची पाहणी करत आहेत. जयपूरमध्ये एका शाळेत गेल्यावर सीजेपीच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली होती. या कार्यकर्त्यांना पळवून पळवून मारहाण करण्यात आली होती. दरम्यान आता  बीडमध्ये या सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा अभिजीत दीपकेंसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

बीडच्या आष्टी तालुक्यातील वेताळवाडी जिल्हा परिषद शाळेत सीजेपीचे कार्यकर्ते आले होते. या कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन शाळेतील असुविधांचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली होती. मात्र, कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर मुख्याध्यापकांना मारहाण आणि दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्याध्यापक राम खाडे यांच्या तक्रारीवरून सीजेपी कार्यकर्ते तुकाराम वनवे आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने सीजेपीचे कार्यकर्ते संतापले आहेत. शाळा प्रशासनाने सूडबुद्धीने खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप करत कॉक्रोच जनता पार्टीने थेट गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. यावेळी परस्परविरोधी आरोप-प्रत्यारोपांमुळे सीजेपीच्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानाला गालबोट लागले आहे. सीजेपी कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group