मोठी बातमी ! अभिजीत दीपके यांना जामीन मंजूर; पण 'या' अटीशर्ती  लागू
मोठी बातमी ! अभिजीत दीपके यांना जामीन मंजूर; पण 'या' अटीशर्ती लागू
img
Nandini khandare More

अभिजीत दीपके यांना जामीन मंजूर झाल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. न्यायालयाने काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे लक्ष लागलेल्या सर्वांसाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. मात्र, जामीन मंजूर करताना न्यायालयाने कोणत्या अटी घातल्या? अभिजीत दीपके यांना नेमका काय दिलासा मिळाला? जाणून घ्या सविस्तर.

'तिरंगा मार्च'च्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी त्यांना काल ताब्यात घेतलं होतं, त्यानंतर अटक करण्यात आली होती. आज त्यांना दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना काही अटीशर्तींसह जामीन दिलाय. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १२६ आणि १७० अन्वये, दीपके यांना एक वर्षासाठी शांतता राखण्यासह बंधपत्रातील अटींचे पालन करावे लागेल. 

नेहा बोरा यांनाही जामीन मंजूर करण्यात आलाय. सरकारकडू कायदा सुव्यवस्थेचं धिंडवडे उडवले जात असल्याची टीका नेहा बोरा यांनी तुरुंगाबाहेर येताच केली होती. सामान्य नागरिकांशी अशाप्रकारे वागले जाते जणू ते मोठे गुन्हेगारच आहेत, ही प्रथा या देशात दीर्घकाळापासून सुरू असल्याची टीकाही नेहा बोरा यांनी केली होती. दरम्यान दुसरीकडे सीजेपीचे इतर दोन कार्यकर्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना अजून जामीन मिळाला नाहीये. दीपके यांना दिल्लीमधील दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, त्यावेळी कोर्टाबाहेर कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

सीजेपीने सौरव दास आणि आशुतोष रांका अटकेच्या निषेधार्थ तिरंगा लहरा दो या मोर्चाचे आयोजन केले होते. दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या या मोर्चाला परवानगी दिलेली नव्हती. कनॉट प्लेस आणि आसपासच्या परिसरात 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' (BNSS) च्या कलम १६३ अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आलीय. पोलिसांनी नागरिकांना या भागात जाणे टाळण्याचे आवाहन केलंय. जंतरमंतर येथे मोर्चा सुरू असताना सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

इतर बातम्या
Join Whatsapp Group