धर्मेंद्र प्रधान यांच्या  राजीनाम्यानंतर अभिजित दीपके यांच्या आणखी 2 मोठ्या मागण्या ! काय आहेत वाचा
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दीपके यांच्या आणखी 2 मोठ्या मागण्या ! काय आहेत वाचा
img
Nandini khandare More
दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाले संपूर्ण देशात खळबळ निर्माण झाली असून आता मात्र सीजेपीच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा अखेर दिला आहे.  दरम्यान अजूनही हे आंदोलन संपेलले नसून  सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी समोर येत आमचे दिल्लीतील आंदोलन सुरूच राहील, असे सांगितले आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

 आता राजीनामा झाला म्हणजे आंदोलन संपले, असे गृहित धरले जाईल. परंतु आम्ही कॉकरोच आहोत. आम्ही लगेच मैदान सोडणार नाही. आमच्या आणखी दोन मागण्या आहेत, असंही ते म्हणाले.  ज्या विद्यार्थींनी आत्महत्या केल्या त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाना एक कोटीची आर्थिक मदत. दिली पाहिजे. गुंडगिरी करणाऱ्या पोलिसांनी जो लाढीचार्ज केला होता, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा, सचिन शर्मा यांनी अमित शाहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून तरुणांवर लाठीचार्ज केला. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. 20 जुलैनंतर ज्या-ज्या विद्यार्थ्यांवर कारवाई झाली, गुन्हे दाखल झाले ते सर्व मागे घेतले पाहिजेत, अशा मागण्या त्यांनी केल्या. दरम्यान, आता दीपके यांच्या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group