दिल्लीमध्ये पुन्हा एकदा CJPच्या आंदोलनाचा भडका ! ५७ मेट्रो स्टेशन बंद, अनेक ट्रेन रद्द
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा CJPच्या आंदोलनाचा भडका ! ५७ मेट्रो स्टेशन बंद, अनेक ट्रेन रद्द
img
Nandini khandare More
देशात सध्या आंदोलनावरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. कॉक्रोचे जनता पार्टी पुन्हा एकदा  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाली असून एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीच्या जंतर मंतरवर पुन्हा आंदोलनाची घोषणा केली. १० ऑक्टोबर रोजी सकाळी सीजेपी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू करणार आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ५७ मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. ९ ऑक्टोबरच्या रात्री ९ वाजल्यापासून दिल्लीतील मेट्रोसेवा बंद राहणार आहे. त्याचसोबत दिल्लीमध्ये येणाऱ्या अनेक लांबपल्ल्याच्या ट्रेन आणि दिल्लीतून सुटणाऱ्या एक्स्प्रेस बंद करण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील ५७ मेट्रो स्टेशन सीजेपीच्या आंदोलनामुळे बंद करण्यात येणार आहेत. मेट्रोसेवा आज रात्रीपासून बंद राहणार आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत हे मेट्रो स्टेशन बंद राहणार आहेत. दिल्ली पोलिसांनीच डीएमआरसीला पत्र लिहित मेट्रो स्टेशन बंद करण्याचा प्रस्ताव दिला होता. यामध्ये ५७ मेट्रो स्टेशनवर एन्ट्री आणि एक्झिट बंद करण्यात यावेत असे पोलिसांनी डीएमआरसीला सांगितले होते. पोलिसांनी दिलेला प्रस्ताव मान्य करत डीएमआरसीने मेट्रो स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेतला.

दिल्लीतील ५७ मेट्रो स्टेशनचे दरवाजे आज रात्रीपासून बंद होतील. या स्टेशनची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मध्य दिल्ली, नवी दिल्ली, जुनी दिल्ली, दक्षिण दिल्ली, पूर्व दिल्ली आणि वायव्य दिल्ली येथील अनेक मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी आपापल्या स्थानकांची स्थिती तपासून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मेट्रो स्टेशन बंद राहणार असल्यामुळे दिल्लीकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील रेल्वेसेवेवर देखील परिणाम होणार आहे. भारतीय रेल्वेने १० ऑक्टोबर रोजी पहाटे ४ ते दुपारी २ या वेळीत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या सर्व मेल आणि एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत. दोन्ही रेल्वे स्टेशनच्या आसपास मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीतून सुटणाऱ्या अनेक ट्रेन देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group