अभिजीत दिपके यांची अचानक तब्येत खालावली ! नेमकं काय घडलं?
अभिजीत दिपके यांची अचानक तब्येत खालावली ! नेमकं काय घडलं?
img
Nandini khandare More

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरू होते. अखेर सरकारला आंदोलनांपुढे झुकावे लागले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

दरम्यान आता आता अभिजीत दिपके याच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट पुढे येताना दिसत आहे. अभिजीत दीपके यांची तब्येत खालावली आहे. भेटीसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत असताना अभिजीत दीपके यांना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास  सुरू झाला. तब्येत बिघडल्याने त्यांनी भेट अर्धवट सोडली आणि उर्वरित नागरिकांना न भेटताच दिपके घरात परतले.

उलटी आणि मळमळ झाल्याने उपचार सुरू
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, थोड्या वेळापूर्वी अभिजीत दिपके यांना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांचा अशक्तपणा वाढल्याने त्यांची तब्येत खालावली. त्रास वाढल्याचे लक्षात येताच घरातील मंडळींनी आणि सहकाऱ्यांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधला.

यानंतर डॉक्टरांचं एक विशेष पथक उपचार करण्यासाठी थेट अभिजीत दिपके यांच्या घरी दाखल झालं आहे. सध्या डॉक्टरांकडून त्यांच्यावर घरीच उपचार केले जात आहेत. डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असून, आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा घरीच उपलब्ध करून दिली जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group