क्रूरतेचा कळस ! लग्नाला नकार दिल्याने गर्लफेंडला पेट्रोल टाकून जिंवत जाळल
क्रूरतेचा कळस ! लग्नाला नकार दिल्याने गर्लफेंडला पेट्रोल टाकून जिंवत जाळल
img
Nandini khandare More

प्रेम प्रकरणातून अनेक गुन्हे घाट असून. प्रेमीयुगुलामधील वाद विकोप्याला जाऊन त्यातून घडत असलेल्या भयावह घटना आटोक्यात आणणे आता अवघड झाले असून आता अशीच एक घटना समोर आली आहे. 

मध्य प्रदेशच्या इंदूरच्या खजराना भागातील ही घटना घडली आहे. तपेश्वरी बाग कॉलनीच्या एका भाड्याच्या खोलीत बँकमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. मागील दोन दिवसांपासून तरुणी कुटुंबाच्या संपर्कात नव्हती. खोलीतील सर्व परिस्थिती पाहून पोलिसांनी आत्महत्येचा संशय व्यक्त केला. तर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तरुणीचा मृत्यूने आगीत होरपळून झाला नसल्याचा दावा केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीचा मृत्यू हा गळा दाबून हत्या केल्यानंतर झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी या प्रकरणी अनेक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक पुरावे गोळा केले. तसेच घटनास्थळाच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावेळी एका सीसीटीव्ही फुटेजमधून एक तरुण पेट्रोलचा डबा घटनास्थळी घेऊन जाताना दिसत आहे. .या पुरावाच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. याच पुरावाच्या आधारे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.

पेट्रोल टाकून जिवंत जाळलं 

मयंक शाक्य असे आरोपीचे नाव असल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे एकमेकांना मागील पाच वर्षांपासून ओळखत होते. दोघांमध्ये लग्नावरून वाद सुरू होते. पोलिसांच्या माहितीनुसार, पलकने मयंकला लग्नास नकार दिला. त्यानंतर मयंकने पलकची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर पलकच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. त्यानंतर पलकने घरात आत्महत्या केली असावी, अशी स्थिती निर्माण केली.

पोलिसांकडून मयंकच्या विरोधात गुन्हा दाखल

मयंकने हत्या केल्याचे पुरावे मिटवायचे होते. तसेच तपासाला दुसरे वळण द्याचे होते. परंतु पोस्टमार्ट रिपोर्ट आल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मयंकला अटक केली. त्यानंतर हत्या करून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group