नीट परीक्षेवरून सध्या देशात मोठी खळबळ निर्माण झाली असून नीट पेपरफुटी प्रकरणावरून cjp आक्रमक झाले असून जवाजवळ महिनाभरापासून आंदोलन सुरु आहे. या आंदोनवरून देखील मोठा गदारोळ सुरु असून दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरु असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी परिसराची सुरक्षा वाढवली आहे. जंतर-मंतरवरील आंदोलकांच्या वाढत्या संख्येवरून दिल्ली पोलीस आणखी अलर्ट झाले आहेत. बॅरिकेट्स पाडले जाऊ नयेत, यासाठी रस्त्यावर खिळे आणि स्क्रू ठोकून लोखंडी पत्रे बसवल्याचे समोर आलं आहे. दिल्ली पोलिसांच्या सुरक्षेकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
दिल्ली पोलिसांनी बॅरिकेट्स लोखंडी साखळ्यांनी बांधले आहेत. दिल्लीचे पोलीस सहआयुक्त विजय सिंह आणि त्यांचं पथक संसदेच्या मार्गावर नजर ठेवून आहेत. परिस्थिती आताही सामान्य आहे. बेरिकेट्स नव्या पद्धतीने फिक्स केले जात आहेत. जयसिंह मार्गाच्या समोर जंतर-मंतर आहे. जयसिंह मार्ग आणि जंतर-मंतरच्या मधल्या मार्गात संसद आहे. त्यामुळे चारी बाजूने बॅरिकेट्स लावून मार्ग रोखला आहे. एका पेक्षा जास्त थरांचे बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. त्यानंतरही संसदेच्या मार्गाजवळ गर्दी वाढताना दिसत आहे.
पोलिसांची सुरक्षा व्यवस्था पाहिल्यानंतर बॅरिकेट्सचे तीन वेगवेगळे थर लावले आहेत. त्यानंतर या बॅरिकेट्सला लोखंडी साखळीने बांधलं आहे. त्यामुळे हे बॅरिकेट्स लवकर हटवता येणार नाही. या बॅरिकेट्सच्या खाली लोखंडी पत्रे देखील ठेवण्यात आले आहेत.
पोलिसांचं उद्दिष्ट काय?
दिल्लीत परिस्थितीत चिघळल्यास आंदोलकांनी अडथळे हटवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही बॅरिकेट्स हवटला जाणार नाही. रस्त्यावरील बेरिकेट्स फिक्स करण्यासाठी अनेक मोठे खिळे ठोकल्याचे दिसत आहे. बॅरिकेट्स खिळे ठोकून घट्ट बसवल्याने आंदोलकांना हटवणे अवघड जाईल, यासाठी पोलिसांनी आधीच योजना आखल्याचे सांगितले जात आहे.
तत्पूर्वी, दिल्ली पोलिसांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कलम 163 लागू केला आहे. आजही मेट्रोचे 18 स्टेशन बंद आहेत. आता थेट फूड डिलिव्हरी आणि कॅभ सेवेवरही निर्बंध लादले आहेत. त्याचबरोबर हॉटेल, रेस्टॉरंट सायंकाळी 6.30 नंतर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली पोलिसांच्या निर्बंधावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.