डॉक्टरांना मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका
डॉक्टरांना मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेंना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका
img
Nandini khandare More

गेल्या काही दिवसांआधी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवर शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टरांना मारहाण केली होती. या प्रकरणाने मोठी खळबळ  निर्माण झाली होती. दरम्यान आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकरणात आरोपी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या विचारांना कडक शब्दांत फटकारले आहे.

कोर्टात नक्की काय घडले? शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायाधीशांचा आक्रमक कल पाहून म्हात्रे यांच्या वकिलांनी याचिका मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

राज्य सरकारने म्हात्रे यांच्याविरोधात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेवर (SLP) न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने म्हात्रे यांना नोटीस बजावली आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी ३ आठवड्यांचा वेळ दिला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता २८ सप्टेंबर २०२६ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

न्यायालयाचे कडक ताशेरे सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी विचारले की, डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसून त्यांना अमानुष मारहाण करणे कसे योग्य ठरू शकते? हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा नाही तर सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group