राजकीय वर्तुळात खळबळ! विरोधी पक्षाचे तीन आमदार भाजपच्या वाटेवर
राजकीय वर्तुळात खळबळ! विरोधी पक्षाचे तीन आमदार भाजपच्या वाटेवर
img
Nandini khandare More
देशभरातील राजकारणात मोठ्या हालचाली सुरु असून सध्या राजकरणात पक्षांतराचे सत्र सुरूच असून आता उत्तर प्रदेशच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच विरोधक समाजवादी पक्षाला (सपा) जोरदार धक्का बसला आहे. आमदार राकेश प्रताप सिंह यांच्यासह तीन आमदार आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. या राजकीय घडामोडीमुळे विरोधकांना मोठा धक्का बसला आहे. या पक्ष प्रवेशामुळे आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीने या पक्षप्रवेशाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

समाजवादी पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले गौरीगंजचे आमदार राकेश प्रताप सिंह हे आज अधिकृतपणे भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत गोसाईगंजचे आमदार अभय सिंह आणि कालपीचे आमदार विनोद चतुर्वेदी हेदेखील ‘कमळ’ हाती घेणार आहेत. या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी, मागासवर्गीय आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरपाल मौर्य आणि मंत्री दारा सिंह चौहान यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे.

सपाच्या तिकिटावर सलग तीन वेळा निवडून आलेले राकेश प्रताप सिंह हे गेल्या तीन वर्षांपासून पक्षापासून दुरावले होते. सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानस आणि इतर धार्मिक मुद्द्यांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांना राकेश सिंह यांनी उघडपणे विरोध केला होता. एका धार्मिक मंचावरून त्यांनी याविरोधात आवाज उठवला, ज्यानंतर सपा नेतृत्वाशी त्यांचे मतभेद अधिकच वाढले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षांची भूमिका बाजूला ठेवून भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्यासाठी थेट प्रचार केला होता. निवडणुकीपूर्वीच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, या तीन आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात विरोधी पक्षांना मोठा फटका बसल्याचे मानले जात आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group