....तर 10 मिनिटात महाराष्ट्र बंद झाला पाहिजे ! मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
....तर 10 मिनिटात महाराष्ट्र बंद झाला पाहिजे ! मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
img
Nandini khandare More
राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा तापला असून  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. सरकार जाणूनबुजून हयगय आणि हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप करत जरांगे यांनी मराठा समाजाचा रोष वाढत असल्याचं म्हटलं आहे. तसेच, सरकारने 12 तारखेपर्यंतचा वेळ दिला असून त्या दिवशी सर्व मराठ्यांनी अंतरवाली सराटीमध्ये यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. मुंबईत एका जरी तरुणाचं रक्त निघाले तर 10 मिनिटात महाराष्ट्र बंद झाला पाहिजे, असे म्हणत त्यांनी सरकारला थेट इशारा दिलाय. 

तसेच, आपण सरकारला 12 तारखेपर्यंतचा वेळ दिलाय. सगळ्या मंत्र्यांनी सांगितले होते, तुम्हाला उपोषणाची वेळ येणार नाही म्हणून. मार्च, फेब्रुवारीला प्रसाद लाड म्हटले होते, आम्हाला बोलवा. ते म्हणाले, फडणवीस मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करतील. म्हणून लाड यांना बोलावले होते. एक वर्षात त्यांनी काही केले नाही.”

“शिंदे-फडणवीसांची ही मिलीभगत आहे. शिंदेंचे दोन मंत्री आणि दोन प्रवक्ते यांनी आंदोलन मोडीत काढीत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. मुंबईकडे निघाल्यावर हल्ला करून फडणवींना बदनाम करण्याचा सरकारचा डाव आहे. बावनकुळे आणि त्याच्या माणसाचं पण तेच चालू आहे. दोन-तीन दिवस दोन-तीन पत्रकार साधे भेटले, त्याला सल्ले विचारत आहेत. मोडीत काढायचे त्यांनी सांगितले. मुंबईला गेल्यावर यांनी हल्ला केला तर समजायचं. मुंबईकडे जाताना अडवले नाही तर आपल्याला खरी माहिती मिळाली नव्हती,” असं जरांगे म्हणाले.


12 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये मोठ्या संख्येने मराठा समाजाने उपस्थित राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं. “12 तारखेला सर्व मराठ्यांनी अंतरवालीमध्ये यायचे. सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, नगर, नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावागावातील मराठ्यांनी अंतरवालीमध्ये या. प्रत्यक्ष सगळ्यांनी या. आता आंदोलकांनी आले नाही तरी चालेल, पण 12 तारखेला या. 10 लोक असले तरी मुंबईकडे जाणार,” असं त्यांनी सांगितलं.

यावेळी जरांगे यांनी मुंबईतील संभाव्य परिस्थितीचा उल्लेख करत इशारा दिला. “मुंबईत एकाजरी तरुणाचं रक्त निघाले तर 10 मिनिटात महाराष्ट्र बंद झाला पाहिजे. फडणवीसांनी डाव रचून हल्ला केला तर 10 मिनिटात महाराष्ट्र जाम झाला पाहिजे. बंद पडला पाहिजे. पोलिसांनी हल्लाच केला तर पळू नका, चेंगराचेंगरी होते. बंदूक काही करत नाही. पोरांनी धरली तर त्यांना वळवळ करता येणार नाही. मुंबईत दबा धरा. पावनखिंडीत दबा मावळ्यांनी धरला होता. स्वसंरक्षण करण्यासाठी दबा धरा. गेम तर वाजला पाहिजे आणि दिसला नाही पाहिजे. सरकारला कळतच नसेल तर नाईलाज आहे,” असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group