गेल्या अनेक दिवसांपासू देशात विमानाच्या अनेक घटना धक्कादायक घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी विमानांमध्ये टार्टरिक बिघाड होऊन भीषण अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत .
दरम्यान आता दोहा येथून बेंगळुरूला येणाऱ्या विमानासोबत धक्कादायक प्रकार घडला. थेट विमानाची आपत्कालीन लँडिंग करावी लागली. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले. दोहा ते बेंगळुरू इंडिगोच्या 6E1302 या विमानाने गुरुवारी सकाळी मस्कतमध्ये आपत्कालीन लँडिंग केले. विमानाने त्याच्या वेळेवर उड्डाण केले. सर्वकाही व्यवस्थित सुरू असताना आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्याचे मोठे कारण पुढे आले. वैमानिकाची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे हा निर्णया घ्यावा लागला. सर्व प्रवासी सुखरूप असल्याचीही माहिती मिळतंय. खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान मस्कतकडे वळवण्यात आले. वैमानिकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतंय. प्रकृती अचानक खराब झाल्यानंतरही विमानाची सुरक्षित लँडिंग करण्यात आले.
विमान बेंगळुरूकडे जात असताना घडला धक्कादायक प्रकार
विमान मस्कत विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आणि वैमानिकाला उपचारांसाठी त्वरित रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. वैमानिकाची तब्येत अचानक बिघडल्यानंतर विमान मस्कतकडे वळवण्यात आले. इंडिगोची प्रवाशांने प्रवाशांना बेंगळुरूकडे पाठवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. मस्कत विमानतळावर अगोदर प्रवाशांना उतरवण्यात आले.
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण मस्कत येथे उतरले विमान
बेंगळुरूहून मस्कतला दुसरे विमान आणि नवीन कर्मचारी पाठवण्याची व्यवस्था विमान कंपनीने केली. यादरम्यान प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले. प्रवाशांना सुरूवातीला नक्की काय सुरू आहे हे कळाले नाही. अचानक बेंगळुरूला येणारे विमान मस्कत विमानतळावर उतरवण्यात आले. ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले.
मस्कत येथे उतरलेल्या विमानानंतर पुन्हा विमान बेंगळुरूकडे रवाना
मस्कत विमानतळावर उतरवल्यानंतर प्रवाशांना पुन्हा बेंगळुरूच्या दिशेने रवाना करण्यात आले. वैमानिकावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. वैमानिकाची प्रकृती खालावल्यानंतर तात्काळ मस्कतला विमानाचे लँडिंग करण्यात आले. अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळते. अहमदाबादहून लंडनला निघालेल्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमानातील फक्त एकच प्रवासी वाचू शकला. बाकी कोणीही जिवंत राहिले नाही.